भारताचा एल्वीस प्रिस्ले अर्थात शम्मी कपूर अगडबंब पियानो वरून आपली बोटे फिरवत गात आहे - "दिल के झरोके में तुझ को बिठाकर, यादो को तेरी मैं दुल्हन बनाकर". समोर सुरवातीस गोंधळलेली आणि नंतर पश्चाताप झालेली राजश्री.
रागीट नजरेने सिगारेट ओढत बाजूला बसलेला प्राण. वेल ! पूर्वी, हिरो एखाद्या पार्टी मध्ये पियानो वाजवत आपली दर्दभरी कहाणी गात असे. त्यावेळी याचा लॉजिकल शेवट हिरोईनला आपली चूक समजणे आणि मग, तिने आपल्या हिरोची मनधरणी करणे म्हणजे "रुठे हुए को मनाना". यात अंदाजे, सात-आठ रिळे खर्च केल्यावर मनोमिलन व्हायचे.
याचे मूळ त्यावेळच्या समाजातच होते. मेल शोविनिझम म्हणजे काहीही झाले तरी पुरुष प्रत्येक बाबतीत वरचढ आहे अशी समाजाची पक्की धारणा होती. बट भाऊ! थिंगी चेंज्ड.
याचे मूळ त्यावेळच्या समाजातच होते. मेल शोविनिझम म्हणजे काहीही झाले तरी पुरुष प्रत्येक बाबतीत वरचढ आहे अशी समाजाची पक्की धारणा होती. बट भाऊ! थिंगी चेंज्ड.
ऑन आणि ऑफ स्क्रीन. जेन्डर इक्वालीटी आली. आमचे हक्क आले. आता आम्ही स्वतंत्र विचाराच्या झालोय. मग ! मी का नमते घ्यायचे? ठीक आहे .
कोणीतरी एक पाऊल मागे घेऊन अपोलोजी द्यायला हवी ना? बघूया काय होते. ज्याला इंग्लिश मध्ये "हू ब्लीन्क्स फर्स्ट?" म्हणतात त्याची वाट बघायची माझी तयारी आहे. आता दोन्ही बाजू तयारीनिशी आल्या आहेत . तोच खटकणारा अबोला, असह्य वाटणारी रिलेशन मधली शांतता. "कोरड्या हातांचाच स्पर्श, कोरडे उसासे अन शब्द”अशा पेनफुल सिच्युएशन मध्ये बघूया कोण आधी कोलमडत आहे? हू ब्लीन्क्स फर्स्ट?
मला हा माइंडगेम ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स वापरतात त्याहूनही भयानक आणि म्यूच्युअली हानिकारक internecine वाटतो.
So, हू ब्लीन्क्स फर्स्ट?
आज ज्याची चूक आहे ती व्यक्ती माघार घेणार असे नाही. कारण,चूक कि बरोबर हे कोण ठरवणार? आपले
आतले मन कोपराने आपल्याला ढोसत असते "खरे सांगू? तू चुकला आहेस. तू असे सगळ्यांसमोर सांगायला नको होतेस. खूप अपमानास्पद होते". पण........ नाही. आज मी आतला आवाज कि काय असतो ते ऐकणार नाही. "गेलास उडत!"
आतले मन कोपराने आपल्याला ढोसत असते "खरे सांगू? तू चुकला आहेस. तू असे सगळ्यांसमोर सांगायला नको होतेस. खूप अपमानास्पद होते". पण........ नाही. आज मी आतला आवाज कि काय असतो ते ऐकणार नाही. "गेलास उडत!"
"छैय्या छैय्या गर्ल" मलायका अरोराने पण "गेलास उडत!"चा राग आळवला आहेच. हि झाली रिच-अन-फ़ेमस यांची उदाहरणे. माझ्या ओळखीचा एक मित्र कुटुंब न्यायालयात वरिष्ठ वकील आहे.त्याचा अनुभव आहे कि शहरांत विभक्त होण्याचे प्रमाण वाढत आहे. अजूनही,त्यातील बऱ्याच केसेस "हु ब्लीन्क्स फर्स्ट?" पर्यंत जाऊन ठेपल्या आहेत . त्याचा शेवट कुटुंब न्यायालयात होणार आहे. जो शेवट असेल तोच लॉजिकल आहे असे मानणारी पिढी देखील आहे.
उसने अवसान आणून "वुई आर स्टील फ्रेंड्स" म्हणणे तर हास्यास्पद आहे. मग, आधी कोण होतात? फक्त फ्रेंड का? माइंडशेअर नाही? "दबंग" चित्रपटात सलमान खानचा डायलॉग आहे"मैं तो खुद कि भी नही सुनता हूँ !".
मनुष्याला स्वातंत्र्याचा "वारा" लागला आणि त्याला पूर्वीपेक्षा जास्त अधिकार मिळाले कि तो कोणाचेच ऐकायच्या मनस्थितीत नसतो. असे का होते? हू ब्लीन्क्स फर्स्ट? कुठलीही तडजोड करणे म्हणजे आपला सपशेल पराभव आहे असे का वाटू लागतो? माझ्याकडे तरी याचे उत्तर नाही. तुमच्या कडे आहे? – Blunt Puru | datepuru@gmail.com
No comments:
Post a Comment